सह्याद्री चौफेर | न्यूज
वणी : तालुक्यातील नदीलगत च्या गावाला पुराचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. परिसरातील गावागावात पाणी शिरले नायगाव (बू), झोला, रांगना, भुरकी, सेलू, सावंगी, शिवणी, मुंगोली, उकणी या गावासह जवळपास 15 गावात पुराच पाणी घरात शिरले. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाले.
अशावेळी आरोग्याची काळजी घेत संजय भाऊ देरकर यांनी नायगाव येथील सर्व मित्रपरिवारांची तात्काळ बैठक ग्राम पंचायत येथे घेवून डॉ सचिन दुमोरे व डॉ विलास बोबडे यांच्या माध्यमातून कोना व सावंगी येथील पूर पीडितांना औषधं वाटप केली. सदरहू औषधं नायगाव येथील आशा सेविकांना सुपूर्द करण्यात आली. व सर्वोतपरी मदत करण्याचे याप्रसंगी सूचना केल्या.
यावेळी गावातील आनंद बोबडे (उपसरपंच), ज्ञानेश्वर देवतळे व मंडळी, प्रवीण खानझोडे, विलास कालेकर, भगवान मोहिते, लोकेश बोबडे, सरपंच विठ्ठल बोन्डे शिंदोला, संजय डवरे, प्रभाकर बोबडे, शेखर वाभिटकर हेमंत बोबडे,धनराज राजूरकर, विनोद वैरागडे, मिलाप कोल्हे, रत्नाकर बोबडे व मित्रपरिवार उपस्थित होते.
अशा संकटाच्या वेळी प्रशासकीय यंत्रणा पोहचायला विलंब होतो म्हणून संजय देरकर समर्थकांनी पुढाकार घेतला.