उमेश गोलेपल्लीवार | सह्याद्री चौफेर
चंद्रपूर : इरई नदी काठचा रेल्वे पूलाखालच्या रस्त्याचा भाग नेहमी पुराच्या पाण्यामुळे पाण्याखाली येत असून या रस्त्याने ये जा करणाऱ्या शेतकरी शेतमजूर कामगार विद्यार्थी लोकांना अडचणीचा सामना करावा लागत असतो याच रस्त्याच्या बाजूला उंच भागातून रस्त्याचे मजबुतीकरण,खडीकरण झाल्यास लोकांना टू व्हीलर ऑटो या छोट्या वाहनाने ये जा करता येणार ही मागणी श्री. अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा यांनी मा.आमदार श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री यांच्याकडे केली असता
त्यांनी लगेच या विषयाशी दखल घेऊन या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांना फोन द्वारे या विषयाची माहिती देऊन तात्काळ दखल घेण्यात यावी अशे आदेश देण्यात आले असता माननीय कूंभे साहेब कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग चंद्रपूर व त्यांचे सहकारी अमरशेट्टीवार सर यांनी स्वतः त्या ठिकाणाची पाहणी करून त्याच ठिकाणी या कामाचे निवेदन स्वीकारून हे काम लवकरात लवकर करून देणार असा विश्वास दिला. यावेळी श्री सुभाष गोरकार भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री नामदेव पिंगे श्री गजानन म्हणाले हे यावेळी उपस्थित होते.