टॉप बातम्या

ग्रंथालयाच्या निर्मितीसाठी उपकेंद्राच्या निवासस्थानाची झाली तोडफोड


उमेश गोलेपल्लीवार |सह्याद्री चौफेर 

सावली : जिबगाव उपकेंद्राचे निवासस्थान खाली असल्याच्या सबबी खाली ग्रंथालयांच्या निर्मिती साठी चक्क उपकेंद्राच्या निवासस्थानाची तोडफोड केल्याचा प्रकार समोर येत आहे.

मात्र अश्या गंभीर बाबी कडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसते मात्र उपकेंद्राच्या निवासस्थानाची तोडफोड झाली असल्याने त्या बाबतची तक्रार तालुका आरोग्य विभाग सावली आणि आरोग्य विभाग चंद्रपुर यांच्याकडे संबंधित विभागाने केली असल्याचे बोलले जात आहे मात्र ग्रंथालयांच्या निर्मिती साठी उपकेंद्राच्या निवासस्थानाची तोडफोड करण्याकरीत तसा कोणताही ठराव घेण्यात आला नसल्याची दबकया आवाजात चर्च्या आहे. मग बेधडक निवासस्थानाची तोडफोड करण्यात आली, ही मनमानी कुणाची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
1560 लोकसख्या असलेल्याता लुक्यातील जिबगाव येथे 1990 – 91 पूर्वी आरोग्य उप केंन्द्राची निर्मिति आणि त्या उपकेंद्रात निवासी एक आरोग्य सेवीकेसाठी निवासस्थानाची निर्मिती करण्यात आली असे जून जानकार सांगतात तेव्हा सदर उप केन्द्रातुन भाटीजांब बु, पेटगाव माल, जिबगाव अश्या चार गावासाठी आरोग्य सेवा पुरविली जात होती मात्र आरोग्य सेविकेचे पद रिक्त असल्याने आरोग्य सेवीकेसाठी असलेले निवास्थान खाली होते परिणामी गाव तिथे वाचनालय या धोरना नुसार आणि ”पढ़ाई भीऔर सफाई भी ” या अभियानाअंतर्गत आणि पं.स. माध्यमातुन तालुक्यातील 11 गावात वाचनालय मंजूर झाले त्यात जिबगावाचा समावेश असल्याने आणि वाचनालयासाठी स्वतंत्र इमारत नसल्याने खाली असलेल्या उपकेंद्राच्या निवास्थानाची वाचनालय निर्मिति साठी तोडफोड करण्यात आली.
गावातील पदाधिकारी यांच्या सहकार्याने आणि लोकसहभाग; आणि ग्रा पं च्या स्वनिधीतुन गावातील कोणतीही शासकीय ईमारत अश्या ठिकाणी वाचनालय सुरु करण्याचे निकष असल्याने खाली असलेल्या उपकेंद्राच्या निवास्थानाची ग्रथालयनिर्मिति साठी तोडफोड करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र गावात इतरही काही शासकीय इमारती असताना आरोग्यची सेवा देणाऱ्या आरोग्य सेविकाच्या निवास्थानाची तोडफोड कश्याला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र आरोग्य निवास्थानाच्या तोडफोडी मुळे आरोग्यसेविकांच्या निवास्थानाची समस्या निर्माण होत असल्याने अश्या गंभीर बाबीची सबंधित विभाग काय व्यवस्था निर्माण करते याकडे सर्वाचे लक्ष लागले असले तरी ग्रथालयाच्या निर्मिती साठी आरोग्याच्या निवास्थानाचे नुकसान करण्यात आले आहे. 
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();