टॉप बातम्या

देवी लाखापूर (मार्ग) शेतातील झुकलेले विद्युत खांब सरळ करण्यासाठी मनुष्य बळाची गरज

चंदू राऊत : सह्याद्री चौफेर 

मारेगाव : सध्या पावसाने तालुक्यात चांगलेच थैमान घातले आहे. जन जीवन प्रभावित झाले असून पाऊस थांबायचं नाव घेतच नाही, मागील चार दिवसापासून संततधार पाऊस सुरूच आहे. आता पाऊस नको अशी वरुण राजाला जन सामान्यातून आर्तहाक केली जात आहे.
अशातच देवी (वनोजा) ते लाखापूर रस्त्याच्या कडेला उभे असलेली जिवंत विद्युत खांब अतिवृष्टीने झुकली आहे. तर ठीकणी विद्युत पोल (खांब) पडले आहे. त्यामुळे मोठी हानी होऊ शकते अशी शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात असल्याची 'सह्याद्री चौफेर' ला बोलून दाखविली आहे.
परिणामी या गंभीर बाबीची दखल घेत या विभागाचे लाईनमन कातकडे यांनी भर पावसात होणारी हानी कशी टाळता येईल त्यासाठी त्यांचेकडून प्रयत्न केले जात आहे. मात्र, सदर काम एकट्याचे नसून महावितरण कंपनीने त्यांच्या मदतीला आणखी मनुष्य बळाची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे हात घालावे. वं पुढील होणारी हानी टाळावी अशी मागणी शेतकऱ्यांसह स्थानिकांची आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();