सह्याद्री न्यूज | रवि घुमे
मारेगाव : तालुक्यातील गोंड बुरांडा येथे स्व. रोहिदास यशवंत दगडे स्म्रुतीप्रीत्यर्थ भागवत कथेचा कार्यक्रम दगडे परिवाराकडून आयोजित करण्यात आला.
ह. भ. प. भागवताचार्य श्री. श्रीकृष्ण कुमार पांडे महाराज यांच्या मधुर वानीतुन भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने येतानी दिसत आहेत. बाहेर गावावरून येणाऱ्या भाविकांकरीता गावकऱ्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहेत.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यास दगडे परिवाराला सर्व गावकऱ्यांची सर्वच प्रकारची मद्द्त असल्याने भागवत कथेचा आनंद येथील भाविक मनसोक्त घेतानी दिसत आहेत.
या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती संख्या मोठी आहेत. हा सप्ताह २८ डिसेंबर ला मिरवणूक काढून यांची समाप्ती २९ डिसेंबर ला होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहेत.
गोंड बुरांडा येथे भागवत सप्ताहाचे आयोजन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
December 26, 2021
Rating:
