सह्याद्री न्यूज | विवेक तोडासे
मारेगाव, (०१ संप्टें.) : शहरातील फरार आरोपी विक्की उर्फ प्रीतम मोहितकर (३५) रा.प्रभाग क्रं.४ मारेगाव याला अखेर दि.३० ऑगस्ट रोजी वणी नांदेपेरा चौफुली वरून अटक करण्यात आली. त्याच्यावर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून ३५४,३५४(अ),(१),(२), (४)३२३,५०६ अंतर्गत गुन्हा नोंद होता. त्यानुसार गेल्या २५ दिवसांपासून मारेगाव पोलीस त्याच्या मागावर होते.
सविस्तर असे की, मारेगावातील एका ३० वर्षीय महिलेला त्याने शरीर सुखाची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत तिच्या दारात जाऊन अश्लील भाषेचा वापर करीत विनयभंग केल्याची घटना ५ ऑगस्टच्या रात्री सुमारास घडली होती. हादरलेल्या पीडितेने आपल्या जीवाला धोका असल्याचे लक्षात घेत, संशयित आरोपी विरुद्ध मारेगाव पोलिस स्टेशन ला जाऊन तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून विक्की मोहितकर हा फरारीत होता.
गेल्या २५ दिवसांपासून मारेगाव पोलीस त्याच्या मागावर होते, मात्र तो चकमा देत होता. अखेर त्याला ३१ ऑगस्ट ला रात्री ८ वाजताच्या दरम्यान, वणी नांदेपेरा चौफुलीवरून आरोपीला मोठया शिताफीने अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार वणी व मारेगाव पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार आनंद आचलेवार, नितीन खांदवे, पो स्टे मारेगाव व नापोका विजय वानखेडे, आशिष टेकाम, उप विभागीय पो. अ.पथक वणी यांनी केली.
अखेर त्याला झाली अटक, गेल्या २५ दिवसांपासून मारेगाव पोलीस होते फरार आरोपीच्या मागावर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 01, 2021
Rating:
