सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागाव, (०२ संप्टें.) : आज तहसील कार्यालय महागाव येथे आयोजित निरोप समारंभ सोहळ्याप्रसंगी उमरखेड उपविभागीय अधिकारी मा. श्री स्वप्निलजी कापडणीस साहेब व महागाव तहसील कार्यालय येथील प्रभारी तहसीलदार मा. श्री नामदेवजी इसळकर साहेब उमरखेड उपविभागमधील सेवेचा कार्यकाळ संपवून इतर ठिकाणी गेल्यामुळे यांचा आपल्या विभागांतील सेवेच्या कार्यकाळातील सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्याकरिता केलेल्या सहकार्याबद्दल शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व प्रभारी उपविभागीय अधिकारी श्री देऊळगावकर साहेब आणि महागाव तहसील चा पदभार असलेले विश्वंभर राणे साहेब यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य डॉ बी, एन चव्हाण सर, माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ नरवाडे, शिवसेना तालुका प्रमुख प्रमोद भरवाडे, शिवसेना शहर प्रमुख राजू राठोड, उपशहर प्रमुख अनिल गव्हाणे व शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसेना महागाव च्या वतीने निरोप समारंभ
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 02, 2021
Rating:
