टॉप बातम्या

Breaking News: डुकरांच्या हल्ल्यात महिला जखमी; कानडा शेत शिवारातील घटना

चंदू राऊत | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : शेतात निंदनाचे काम सुरु असतांना कानडा येथील सौ उषा राजू बावणे (वय 27) यांच्यावर सकाळी 10 वाजता शेतात निंदन सुरु असताना अचानक जंगली डुकराने हल्ला केला असून, यात त्यांना उजव्या पायाला जखमी केले आहे. यावेळी शेतशिवारातील मजुरांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला मार्डी पी एस सी येथे उपचाराकरिता दाखल केले आहे.
उषा नेहमीप्रमाणे सकाळ पाळीत शेतकामाकरिता शेतात गेल्या होत्या, उत्तम येवले यांचे शेतात निंदन काम सुरु असताना अचानक झुडपात असलेल्या जंगली डुकराने उषा बावणे यांच्यावर हल्ला केला यात त्यांच्या उजव्या पायाला मार लागला आहे. ऐन शेतीचा हंगाम सुरू झाला असून शेतात प्रत्येकाला जावे लागतात मात्र, वन्यप्राण्यांच्या होत असलेल्या हल्यामुळे शेतकरी व मजूर वर्गात सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिवरा, दांडगाव, गोरज, शिवणी, मुकटा, कानडा परिसरात झुडपी जंगल असल्याने हरीण, डुक्कर, रोही, ससा यासह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेती आहे, अनेकदा वन्यप्राणी शेतात येऊन शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वन्यप्राण्यांकडून होत असलेली शेतपिकांची नासाडी हि शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे.
पिकाच्या लागवडी पासून तर पीक हातात येईपर्यंत शेतपिकांचे रक्षण करावे लागत आहे, रात्री-बेरात्री पिकांच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना जागली करावे लागते, वन्यप्राण्यांकडून हजारो रुपये किंमतीच्या मालाची नुकसान होत असताना वनविभाग तुटपुंजी मदत करून वेळ काढून नेत असते. वनविभागाकडून यावर कोणतीही उपाय योजना केली जात नसून याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.
वन्यप्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी शेतमजूरांनी केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();