टॉप बातम्या

भव्यदिव्य रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले; स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव समिती चा स्तुत्य उपक्रम

सह्याद्री चौफेर | न्यूज 

वणी : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्ताने वणी शहरातुन भव्य तिरंगा सन्मान मोटरसायकल रॅलीचे महोत्सव समितीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता शासकीय मैदान येथून भव्य तिरंगा सन्मान मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या सन्मान रॅलीत हजारोंच्या संख्येने दुचाकी स्वार सहभागी झाले होते. या रॅलीला आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, मनसे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर, महामंत्री रवि बेलुरकर, ठाणेदार रामकृष्ण महल्ले, यांनी तिरंगा ध्वज दाखवून सुरुवात केली.
 रॅलीमध्ये राजकीय व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक व शहरातील नागरिक सहभागी झाले होते. सदर रॅली शासकीय मैदान येथून वणी शहरातील मुख्य मार्गावरून मार्गक्रमण करून परत शासकीय मैदान (पाण्याची टाकी) येथे राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली. या रॅली नंतर विजयबाबु चोरडिया यांच्या तर्फे उत्तम अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
याप्रसंगी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, मनसे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, भाजपा महाराष्ट्र राज्य सदस्य विजयबाबु चोरडिया, महामंत्री रवि बेलुरकर, ॲड प्रविण पाठक, राजाभाऊ पाथ्रटकर, राकेश खुराणा, विजया आगबत्तलवार, माजी पोलीस पाटील नितीन शिरभाते, पोर्णीमा शिरभाते, फाल्गुन गोहोकार, राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व शहरातील नागरीक उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();