टॉप बातम्या

नवरात्रीत सजवा पूजा थाळी अन् जिंका आकर्षक बक्षिसे!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : नवरात्रीचा पवित्र उत्सव, देवीवरील अपार श्रद्धा आणि घराघरांत जपली जाणारी पारंपरिक पूजा संस्कृती यांचा सुंदर संगम घडवून आणण्यासाठी होपविंग्स सोशल फाउंडेशनतर्फे ‘एक घर–एक पूजा थाळी’ हा अभिनव सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहे. चंद्रपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील माता-भगिनी आणि कुटुंबीयांना आपल्या घरातील सजवलेल्या पूजा थाळीचे छायाचित्र पाठवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पूजेच्या थाळीतील कलात्मकतेला मिळणार व्यासपीठ!
नवरात्रीमध्ये प्रत्येक घरात भक्तिभावाने देवीची पूजा केली जाते. या पूजेसाठी सजविण्यात येणाऱ्या थाळ्यांमध्ये श्रद्धा, परंपरा आणि कलात्मकतेचे दर्शन घडते. हाच भाव जपत घराघरांतील पूजा थाळी सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी फाउंडेशनने हा उपक्रम सुरू केला आहे.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील पूजा थाळी सुंदर पद्धतीने सजवून तिचे छायाचित्र काढायचे आहे. त्यानंतर ते छायाचित्र व्हॉट्सॲपवर पाठवून गुगल फॉर्मद्वारे नोंदणी पूर्ण करायची आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रथम बक्षीस ३,३३३ रुपये आणि ट्रॉफी!
या उपक्रमांतर्गत उत्कृष्ट छायाचित्रांची निवड करून सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ३,३३३ रुपये आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी २,२२२ रुपये, तर तृतीय क्रमांकासाठी १,१११ रुपये असे बक्षिसांचे स्वरूप आहे. याशिवाय सर्व सहभागींसाठी प्रोत्साहनपर भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

नोंदणीसाठी आज आणि उद्या शेवटची संधी!
या उपक्रमाची नोंदणी १६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार असून, नोंदणी शुल्क १११ रुपये आहे. स्पर्धेचा निकाल १८ ऑक्टोबर २०२६ रोजी जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता तातडीने नोंदणी करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9226203995/8329624217
पत्ता : होपविंग्स सोशल फाउंडेशन, विदर्भ एस्टेट-५, देवाडा, चंद्रपूर.

‘समाजासाठी आज… उज्ज्वल भविष्यासाठी कायम…’ हे ब्रीद जपत कार्यरत असलेल्या होपविंग्स सोशल फाउंडेशनच्या या उपक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. आपल्या घरातील भक्ती, परंपरा आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमात सहभागी होऊन नवरात्रीचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन होपविंग्स सोशल फाउंडेशनच्या उपसंचालिका सौ.मनीषा वाकडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();