टॉप बातम्या

माधवबागचे ‘हृदय रोग मुक्त शहर’ अभियान; ४ ऑक्टोबरला चंद्रपुरात विशेष शिबिर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर : हृदयविकारासह मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने माधवबाग क्लिनिकतर्फे ‘हृदय रोग मुक्त शहर’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत विशेष आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात नागरिकांची ईसीजी, हृदयाची गती, रक्तदाब, उंची-वजन, ऑक्सिजन सॅच्युरेशन (SpO₂) आणि BMI यांसह प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, डॉक्टरांचा सल्लाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत CBC, हिमोग्लोबिन, HbA1c, लिपिड प्रोफाइल, लिव्हर प्रोफाइल, किडनी फंक्शन आणि थायरॉईड प्रोफाइल या तपासण्यांचा समावेश असलेली बेसिक रक्त तपासणी ७९९ रुपयांत उपलब्ध आहे. तसेच Vitamin D3, Vitamin B12 आणि hsCRP या तपासण्यांचा समावेश असलेली अॅडव्हान्स रक्त तपासणी १,३९९ रुपयांत करण्यात येणार आहे.

हृदयविकाराचा धोका वेळेत ओळखण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी महत्त्वाची असल्याचे माधवबागकडून सांगण्यात आले. या उपक्रमासाठी पूर्वनियोजित अपॉइंटमेंट घेणे आवश्यक असून, रक्त तपासणीसाठी किमान १२ तास उपाशी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे अभियान माधवबाग क्लिनिक, तुकडोजी, चंद्रपूर आणि माधवबाग क्लिनिक, जयंत टॉकीज चौक, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

संपर्क : ८४८३०३१०२१ / ८७६७३ ००२१३
जयंत टॉकीज चौक : ७३८५७२९१०० / ८७६६९८४२८७


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();