टॉप बातम्या

महात्मा गांधी आणि शास्त्रीजी युगांचे प्रेरणास्थान- संजय खाडे

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : महात्मा गांधी हे संपूर्ण विश्वाचे प्रेरणास्थान आहेत. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. सोबतच मानव उद्धारासाठी केलेल्या त्यांच्या कार्याला कुठेच तोड नाही. असे प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खाडे यांनी केले. गांधी चौक आणि शास्त्रीनगर येथे जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते. 

महात्मा गांधींची जयंती जगभरात अहिंसादिन म्हणून साजरी होते. त्यांच्या विचारांचा जगाने स्वीकार केला. तो आपणही करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
.
 याप्रसंगी अनंतलाल चौधरी, जय आबड, विकेश पानघाटे वंदना आवारी, शामा तोटावार, मोवाडे, अशोक पांडे, प्रमोद लोणारे, अनिल ठाकूरवार, पांडुरंग बत्तुलवार, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, राजू अंकतवार, नीलिमा काळे, पांडुरंग पंडिले, संदीप बोथरा, सुनील इंदुवामन ठाकरे, सुनील वरारकर, शरद मंथनवार, वंदना धगडी, सविता रासेकर आणि नागरिक उपस्थित होते. 



Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();