टॉप बातम्या

कॅन्सरग्रस्त निराधार रुग्णाला ‘थोडंसं जगणं समाजासाठी’चा मदतीचा हात

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील निंबाळा रोड परिसरातील रहिवासी मयूर बोरीकर हा युवक गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. कुटुंबातील एकमेव कर्त्या व्यक्तीवरच गंभीर आजाराचे संकट ओढवल्याने उपचाराचा खर्च भागविताना कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. वृद्ध आईला मुलाच्या उपचारांसोबतच दैनंदिन गरजा भागविण्यासाठीही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बोरीकर कुटुंबाची ही परिस्थिती ‘थोडंसं जगणं समाजासाठी’ या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते गुणवंत पचारे यांच्या निदर्शनास आली. परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी पुढाकार घेत बोरीकर यांच्या घरी भेट देत त्यांच्या आईच्या हाती ११ हजार ११६ रुपये रोख मदत सुपूर्द केली. तसेच उपचाराच्या काळात कुटुंबाला दैनंदिन खर्चाचा काहीसा आधार मिळावा, यासाठी महिनाभराचे किराणा साहित्य व अन्नधान्यही देण्यात आले.

या मदतीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या बोरीकर कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांच्या मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी सेवामंडळाचे मारोतराव ठेंगणे, ज्ञानेश्वर कडुकर, पुंडलिक धोबे, सुनीता ढेंगळे, वनमाला पेंदोर, अनिता इखारे, मनोज ढेंगळे, किरणताई कुत्तरमारे, अरविंद महातळे तसेच निंबाळा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();