मारेगाव : बोलेरो चारचाकी वाहन दुभाजकावर उभ्या ट्रकला धडकून यात मारेगाव येथील चार जन जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवार ला दुपारी 2 वाजता चे दरम्यान, चंद्रपूर-पडोली -घुगूस मार्गांवरील अहमद लॉन चिंचाळा जवळ घडली. या भीषण घटनेने मारेगावकर शोककळा पसरली आहे.
यूसुफ नबीवस्ताद शेख, पत्नी मुमताज यूसुफ शेख, रफीक नबीवस्ताद शेख, पत्नी संजीदा रफीक शेख रा. मारेगाव यांचा भीषण अपघातात ठार झाले आहे. यात शानू ऑटोमोबाईल्स व सानिया कोल्ड्रिंक हाऊसचे संचालक असल्याचे माहिती आहे.
हे कुटुंब काल गुरुवार ला आपल्या नातेवाईकांच्या लग्न कार्याप्रसंगी राजुरा (चंद्रपूर) येथे गेले होते. ते मारेगावकडे परत येताना बोलेरो वाहन क्रमांक एम.एच.29 बि. सी. 6321 ने पडोली घुग्गुस मार्गांवरील चिंचाळा जवळ हे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन दुभाजकावर जोरदार आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला येणाऱ्या ट्रकला जबरदस्त धडकल्याने या वाहणातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर चारचाकी वाहनाचा अक्षरशः चेंदामेदा झाले. या अपघातात मारेगाव येथील दोन सख्ख्ये भाऊ व त्यांच्या अर्धांगिनी गत प्राण झाले.
अपघाताची वार्ता पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात एवढा भीषण होता की, वाहनाचे प्रत्येक भाग गॅस कटरने कापून मृतकांना बाहेर काढण्याचे नियोजन सुरू युद्ध पातळीवर चालू होते. दरम्यान, मृतक थोरला भाऊ रफीक शेख यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे, तर लहान भाऊ युसूफ शेख यांचे पाठीमागे दोन मुली आहे.