टॉप बातम्या

भरधाव स्विफ्टची दुचाकीला धडक; निवृत्त शिक्षकाचा जागीच मृत्यू

सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे 

वणी : शेतातून दुचाकीने वणीकडे परतत असलेल्या निवृत्त शिक्षकाच्या दुचाकीला भरधाव स्विफ्ट कारने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. रविवारी (२७ सप्टेंबर) सायंकाळी ४. 00 वाजताच्या सुमारास घुगूस मार्गावरील जन्नत हॉटेलसमोर हा अपघात घडला.

या दुर्घटनेत बाळासाहेब अंकुजी टोंगे (६७, रा. प्रगतिनगर, वणी) यांचा मृत्यू झाला. टोंगे हे जनता विद्यालयातून शिक्षक पदावरून निवृत्त झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब टोंगे हे रविवारी आपल्या मूळ गावी पुरड येथे दुचाकीने गेले होते. तेथून वणीकडे परतत असताना जन्नत हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एमएच २९ एडी ७७७१ क्रमांकाच्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, टोंगे काही अंतरापर्यंत फरफटत गेल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पुढील कार्यवाही सुरू केली.

निवृत्त शिक्षक बाळासाहेब टोंगे यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच प्रगतिनगर परिसरासह वणी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();