टॉप बातम्या

वणीत गुन्हेगारीला लगाम! कुख्यात गुंड तीन महिन्यांसाठी तडीपार

सह्याद्री चौफेर | वृत्तसेवा

वणी : वणी परिसरात विविध गुन्ह्यांमुळे दहशत निर्माण करणाऱ्या आणि नागरिकांच्या मालमत्ता व जीवितास धोका निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंडावर पोलिसांनी अखेर तडीपारीची कारवाई केली आहे. मोहम्मद जमील ऊर्फ मोलाभाई शेख (वय २३, रा. राजूर कॉलरी, ता. वणी, जि. यवतमाळ) याला मारेगाव व वणी तालुक्याच्या हद्दीतून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

पोलीस नोंदीनुसार मोहम्मद जमील याच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कारवायांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होऊन परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच नागरिकांविरुद्ध हस्तक्षेपजन्य गुन्हे होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव तयार केला.

वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिडूरकर यांनी मोहम्मद जमील ऊर्फ मोलाभाई शेख याच्याविरुद्ध तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी, वणी यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर २ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला मारेगाव व वणी तालुक्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश लागू करण्यात आले.

तडीपारीच्या आदेशानंतर संबंधित आरोपीला वणी तालुक्याबाहेर नेण्यात आले असून, आदेशाच्या कालावधीत त्याने संबंधित हद्दीत प्रवेश करू नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली आहे.

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुदास पिडूरकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();