टॉप बातम्या

मनोज भाऊ केळकर यांची भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जिल्हा महामंत्रीपदी नियुक्ती

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : मनोजभाऊ केळकर यांची यवतमाळ येथे भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांच्या हस्ते त्यांची भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, यवतमाळ जिल्हा महामंत्री तथा वणी विधानसभा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

आदिवासी आघाडीचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय संघटनात्मक कार्याची दखल घेत पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून दिलीप मलांडे भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, यवतमाळ जिल्हाध्यक्ष यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे. 
आज बुधवार रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच नव्या नियुक्तीबद्दल मार्डी येथे ता. सचिव अमोल कुमरे यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी आसोफो चे सदस्य महेश आत्राम, उमेश क्षीरसागर, मारोती सिडाम, कवडू मत्ते, अमोल मोहितकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. उपस्थितांनी महामंत्री केळकर यांना वाढदिवस निमित्त शुभेच्छा देऊन त्यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.




Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();