टॉप बातम्या

सुर्यभान आवारी यांचे राजकारणात पुनरागमन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

वणीमाजी अध्यक्ष सूर्यभान आवारी यांनी पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात पुनरागमन केले आहे. आवारी यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षासाठी झोकून देऊन काम करण्याची ग्वाही दिली.

गेल्या काही वर्षांपासून ते राजकारणापासून अलिप्त राहिले होते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांचा कामाचा धडाका, पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांचे जिल्ह्यातील विकासात्मक योगदान आणि वणी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्यांच्या प्रश्नाला सतत वाचा फोडणारे माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांचे नेतृत्व यांमुळे प्रेरित होऊन आवारी यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले.

हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वणी येथे माजी आमदार व चंद्रपूर-यवतमाळ लोकसभा समन्वयक विश्वास नांदेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

पूर्वीप्रमाणेच व तितक्याच ताकदीने सेनेचे कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार करत, पक्षासाठी समर्पितपणे कार्यरत राहण्याची ग्वाही श्री. आवारी यांनी यावेळी दिली.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();