मारेगाव : अगदी विधानसभेच्या तोंडावर दिवसागणिक भारतीय जनता पक्षाची ताकद वाढताना दिसून येत आहे. अलीकडील काळातील जोरदार पक्षप्रवेशानंतर आज सुद्धा मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष, इतर युवकांनी आज भाजप महायुती चे उमेदवार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते भाजपात पक्ष प्रवेश केला. निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप मध्ये होत असलेली जोरदार इनकमिंग पक्षाला बळकटी देणारी ठरत आहे. याचा फायदा या निवडणुकीत पक्षाला नक्की होणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
शनिवारी पहापळ येथील शाळा व्यवस्थापन समिती चे माजी अध्यक्ष अमोल गुरनुले, मोहन चरडे, विनोद ठेंगणे, प्रज्योत खोके, करण बोकडे, रोहीत झोडे, प्रतीक मडतापे, ऋषिकेश खोके, पवन येरकाडे, तेजस ठेंगणे, रोहन चिकराम, गणेश वाढई, अनिकेत शेंडे, गणेश मोहितकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने कुंभा येथे पक्षांमध्ये प्रवेश केला. सर्वांचे आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, उपाध्यक्ष मारोती तुरणकर, गणेश झाडे, सुनिल देऊळकर, महिला तालुकाध्यक्ष शालिली दारुंडे, प्रवीण बोथले, सरपंच चंदू जवादे, सरपंच प्रवीण नान्हे, सुभाष खडसे, जयंत ठेपाले, सरचिटणीस प्रशांत नांदे, किसान आघाडी चे शंकर लालसरे, मंगेश देशपांडे, दादाराव ठोबरे, राजू मांदाडे, यांच्यासह मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.