हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना निमित्ताने एकात्मता दौड संपन्न

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आज महाविकास आघाडीच्या वतीने हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनाच्या निमित्ताने एकात्मता दौडचे आयोजन करण्यात आले होते. प्राध्यापक दिलीप मालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय पाण्याच्या जवळील शासकिय मैदान पासून सुरूवात कऱण्यात आली. या दौडमध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. दौड शहराच्या मुख्य मार्गाने फिरून संजय भाऊ दरेकर यांच्या निवासस्थानी पोहोचताच त्यांना चहापाणी आणि बिस्कीटचे वितरण करण्यात आले. ती एकात्मता दौड शहराच्या मुख्य मार्गाने फिरून शासकिय मैदानावर सांगता करण्यात आली. यावेळी दिलीप भोयार, प्रविन खानझोडे, संजय देठे, किशोर थरे, शंकर मजगवली, भगवान मोहिते,

हिंदूहृदय सम्राट स्मारकाला अभिवादन: 

आज हिंदुत सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन या स्मृतिदिनाच्या निमित्त महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ देरकर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजेंद्र गायकवाड, उपजिल्हाप्रमुख संजय निखाडे, शरद ठाकरे, दीपक कोकास, राजु तुरणकर, सुधीर थेरे, अजिंक्य शेंडे, सुनील ढोमणे, प्रकाश कराड, गोपी पूरावार, प्रशांत बलकी, सूनंदा गुहे, पुष्पा भोगेकर, थेरे बाबु, शत्रुघ्न मालेकर, निखिल ढेंगले, निलेश करडभुजे व अनेक पदाधिकारी उपस्थिति होतें.