मारेगाव : संजय देरकर यांनी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडी घेतली आहे. तरुण मतदारांसोबतच महिला वर्गही देरकर यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत आहे. शुक्रवारी महाविकास आघाडी चे उमेदवार संजय देरकर यांचा प्रचार ताफा कुंभा सर्कलमध्ये पोहचला, येथील सरपंच अरविंद ठाकरे यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील मशाल व पंजा चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर होऊ घातलेल्या निवडणूकीच्या रिंगणात उभे आहे.त्यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. "भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहो" असे बळ देत नागरिक प्रचारात सामील होत होती. दरम्यान तालुक्यातील मार्डी, बोटोणी, कुंभा परिसर सरपंच अरविंद ठाकरे यांच्या नेतृत्वात पिंजून काढला. सोबतच प्रेमकुमार खुराणा, मयुर ठाकरे, वासुदेव ठाकरे, मारोती मुप्पीडवार,हरीभाऊ वाघ, मोतीरामजी पडोळे,दिलीप पावडे,गोपाळ शेंडे,संदिप डुकरे, दिनेश पाटिल,गजानन अवताडे,मारोती ठाकरे, प्रविण डाहूले, समिर डाहूले, रवी ठाकरे, शालिक किनाके, विनोद ढाकणे आदींची उपस्थिती होती.
तत्पूर्वी सकाळी गौराळा, वरुड, आकापूर, लाखापूर, वनोजा देवी, हिवरा, कानडा, शिवणी (धोबे), पार्डी, चनोडा, चोपण, मार्डी, खैरगांव, चिंचमंडळ, कोथुर्ला, बोरी गदाजी, धरमपोड, घोगुलधरा, खैरगाव, वाघधरा, वसंतनगर सराटी खंदणी भुरकी (पोड) राहेपट आदी गावागावत जाऊन त्यांनी दौरा केला होता.