पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच खात्यातील रक्कम उडविली

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील मार्डी येथील राहुल मेडिकल स्टोअर्स'चे संचालक अतुल देविदास बोबडे यांनी पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच त्यांच्या वेगवेगळ्या दोन बँकेच्या खात्यातील रकमा उडवून त्यांना वीस हजार रुपयाचा गंडा दिला आहे. 
          
मार्डी येथील व्यावसायिक अतुल बोबडे यांनी पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच मोबाईल हॅक करून 19 सप्टेंबरला मोबाईल बंद केला. 20 सप्टेंबर रोजी मारेगाव येथील स्टेट बँकेच्या शाखेतून 5000 रुपये तर, एचडीएफसी बँकेच्या खात्यातून 1100 रुपये परस्पर लांबविण्यात आले. दुसऱ्या दिवशी 21 सप्टेंबरला पुन्हा वेगवेगळ्या ट्रांजेक्शन मधून 12263 रुपये हडप करण्यात आले. यानंतर हॅकरद्वारा व्हाट्स ऍप, फोन पे, गुगल पे बंद करून वेगवेगळ्या कंपनीचे ओटीपी मॅसेज येऊ लागल्याने बोबडे यांनी त्वरित डेबिट कार्ड ब्लॉक केले. याबाबत मारेगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे.      
मात्र,सायबर क्राईम च्या घटनेत सातत्याने वाढ होत असल्याने मोबाईलधारकांनी ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.
पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच खात्यातील रक्कम उडविली पि एम किसान खात्याची लिंक ओपन करताच खात्यातील रक्कम उडविली Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.