सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : सर्वसामान्य जनतेच्या हक्काचा युवा कार्यकर्ता तथा भावी आमदार हरीश पाते वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. कोणताही राजकीय वारसा नसताना सर्वसामान्य कुटुंबातील हरीश पाते मागील काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
गोरगरिबाच्या कामासाठी धावून जातात तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी, बेरोजगारांसाठी काम करत असतात. जात पात न पाहता रात्री बे रात्री उठून ते धावून जातात. तसेच जिथे अन्याय होत असेल तर, ते धावून जातात. आतापर्यंत त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर हात घालून सर्वच कामे प्रशासन दरबारी रेटून धरली. सामाजिक कार्याच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची, बेरोजगारांची त्यांनी काम करून दिलेले आहेत. सर्व समाजातील घटकावर वरती काम करत असतात. असा नवा चेहरा वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरत आहेत.
आंबेडकरी चळवळीचा युवा कार्यकर्ता हरीश पाते....काही ग्रामीण भावात संवाद साधत असताना पिण्याच्या पाण्याच्या, पांदन रस्ता, शेतजमिनीचा मोबदला ह्या समस्या जाणून आल्या. हा प्रश्न सोडण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील असे, यावेळी प्रथम 'सह्याद्री चौफेर' ला बोलताना ते म्हणाले. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभा लढवावी, अशी वणी विधानसभा मतदार संघातील युवकांची इच्छा आहे. आज सर्व संघटना तयार असून सगळ्या कार्यकर्त्यांची देखील एकमेकांशी चर्चा करून इच्छा जाहिर केली आहे.
त्यामुळे "नवा चेहरा, बदल हवा" अशी एक संकल्पना घेत हरीश पाते हे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा लढवण्यास ईच्छुक आहेत.
विधानसभेच्या रिंगणात हरीश पाते उतरणार!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 23, 2024
Rating: