टॉप बातम्या

सौ. रश्मी उद्धव ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ. रश्मी उद्धव ठाकरे व शिवसेना प्रणित युवासेना चे सचिव वरुन सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त वणी ग्रामीण रुग्णालयात युवासेना विस्तारक यवतमाळ जिल्हा धिरज खोडस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात युवासेनेच्या वतीने रुग्णांना फळ वितरण करुन रश्मीवहिनी ठाकरे व वरून सरदेसाई यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 
युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे हे काही ना काहीदरवर्षी सामाजिक उपक्रम राबवित असतात. नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या उपजिल्हा प्रमुखांनी आपल्या युवा सैनिकांना घेऊन सौ रश्मी उद्धव ठाकरे व वरून सरदेसाई यांचा एकत्रित वाढदिवस साजरा केला. यानिमित्त रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. व आरोग्याची विचारपूस केली 

यावेळी धनराज येसेकर, सुधीर ठेंगणे, संतोष राजुरकर, तेजस नागपुरे, सागर गोलाईत, बादल येसेकर, जर्मन शेख, करण नागपुरे, धनराज मडावी, रतन धोबे, अमोल आरेलवार, आर्यन राऊत, सप्नील बल्की इत्यादी युवा सैनिक उपस्थित होते.
Previous Post Next Post