टॉप बातम्या

मारेगावच्या विद्यार्थिनीची चंद्रपूरात आत्महत्या

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : गोंडबुरांडा येथील एका विद्यार्थिनीने चंद्रपूर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल बुधवारला संध्याकाळी 7 वाजणाच्या दरम्यान उघडकीस आली. या दुःखद घटनेने वसतिगृहासह गोंडबुरांडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रांजली यशवंत राजुरकर (वय 17) रा. गोंडबुरांडा असे गळफास घेऊन जगाचा निरोप घेतलेल्या तरुणीचे नाव आहे. प्रांजली ही चंद्रपूर येथील रामनगर जिल्हा क्रीडा संकुलन परिसरात असलेल्या खासगी इन्स्पायर (INSPIRE CLASS) शिकवणी मध्ये 'नीट' ची तयारी करीत होती, असे समजते. तीला अभ्यासाचे टेन्शन असल्याचे तीने लिहून ठेवलं असे कळते. मात्र, आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलणे हे काही उचित नसल्याने आप्तेष्ठ शोक सागरात बुडाला आहे.

मृतक प्रांजली हिच्या पाठीमागे आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर तिच्यावर आज दुपारी मुळगाव असलेले गोंडबुराडा येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आला.

Previous Post Next Post