सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
निवेदनात असेही म्हटलं आहे की, दिनांक 02/09/2023 रोजी असीम अब्दुल सत्तार, नोमान शेख साबीर शेख व प्रतीक संजय मडावी ह्या तीन बालकांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला होता. हे तिन्ही मुलं नमूद डोलामाईट खदानीत पोहण्याकरिता उतरले परंतू पाण्याचा अंदाज न आल्यामूळे त्यांचा बुडून मृत पावले. तिघांचाही मृत्यू या अवैध डोलामाईट खदानीमुळे झाला असल्याचे मुबीन शेख यांचा आरोप असून सदर खदानीकरिता कोणत्याही प्रकारची सुरक्षा, व्यवस्था किंवा रक्षक त्या ठिकाणी हजर नव्हते. त्यामूळे त्यांचा नाहक जीव गमवावा लागला. परिणामी पालकांना निराधार व्हावे लागले आहे. त्यामुळे मृतक तिन्ही बालकांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांचे कुटूंब हे निराधार आणि आधारवड हरवल्याने त्यांना नुकसान भरपाई मिळणे कमप्राप्त असताना त्यांना अजूनपावेतो प्राप्त झाली नाही, असा संतापही त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढे असंही नमूद आहे की, येथील डोलामाईट खदानीकरिता शासकीय परवानगीचे उल्लंघन करण्यात येऊन नियमबाह्य खोद खोदकाम करण्यात आले. तसेच परवानगीचे शर्ती व अटींचे उल्लंघन करुन वरिल खदान ही अत्यंत खोल खोदली असून त्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथील खोदकाम आणि त्यापासून झालेली जिवीतहानी याबाबतची सखोल चौकशी होउन मृतकांच्या पालकांना मदत देण्यात यावी अशी आग्रही मागणी आहे. तसेच परवानाधारकांनी शासनाच्या शर्ती आणि अटींचे केलेल्या उल्लंघनाबाबत त्यांचेविरुध्द उचित कारवाई करण्यात यावी व तातडीने खान बंद करण्यात यावे, अन्यथा राष्ट्रवादी (अजितदादा पवार) गटाच्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येइल असा ईशाराही निवेदनातून देण्यात आला.
निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष मुबीन पीरसाहब शेख, शादाब अहेमद, रितिक चांदेकर,साहिल शेख, श्रीनाथ मृतकाचे वडील सत्तार,मो. साबीर,शारिक शेख आदी उपस्थित होते.