टॉप बातम्या

श्री. व सौ. धानोरकर या दांपत्याचा सेवापूर्ती निरोप समारंभ उत्सहात साजरा



सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : श्री डी टी धानोरकर सर मुख्याध्यापक राष्ट्रीय विद्यालय राजुर (कॉलरी) यांच्या सेवापूर्ती निरोप समारंभ साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थान श्रीमती विमलताई पानघाटे, प्रमुख उपस्थिती संचालक श्री पद्माकर गाडगे, अशोकराव वानखेडे, सौ सीमा एकरे, ओंकार एकरे, सौ शारदा धानोरकर, याच बरोबर वणी परिसरातील मुख्याध्यापक वर्ग सर्वश्री पोटे सर, देवाळकर सर, काळे सर, साळवे सर,यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष श्री अभय पारखी सर, लिपटे सर, लडके सर, आकुलवार सर, खाडे सर, आवर्जून हजर होते. 

त्याच बरोबर राष्ट्रीय विद्यालय राजूर (कॉलरी) चे शिक्षक शेडमाके सर, जुमनाके मॅडम, दुर्गमवार मॅडम, बलकी मॅडम, आवारी मॅडम, हिवरे सर, चांदेकर सर, कोगरे सर, जाधव सर, आसुटकर सर, प्राध्यापक राऊत सर, राठोड सर, चव्हाण सर, येवले सर, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये मयूर पिदूरकर, राजूभाऊ एकरे, अशोक नगराळे, जितेंद्र बोधाडकर, स्वप्निल काळे, अजय भुसारी, अडकिने अशी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. यावेळी मान्यवरांची धानोरकर सरांविषयी मनोगत व्यक्त केली.
Previous Post Next Post