टॉप बातम्या

मातृत्व लादणाऱ्या "त्या" नराधमावर पोक्सो व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अल्पवयीन मुलीचे सतत पाच महिने शारीरिक शोषण करून तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधमाविरुद्ध पिडीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुलीला विविध प्रलोभन व आमिषे दाखवून या नराधमाने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तिला गावाबाहेर निर्जनस्थळी नेऊन तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. अल्पवयीन मुलीला वासनेचा शिकार करणाऱ्या या नराधमाविरुद्ध पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत दिलीप उराडे (३३) असे या अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. 

नराधमाने अनेक क्लुप्त्या लढवत तीला वेगवेगळे आमिष देत अल्पवयीन मुलीवर विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केले, सतत 5 महिने संबंध ठेवले. नंतर तीला गर्भधारणा झाल्याने हा सर्व प्रकार समोर आला. पिडितेच्या वडिलांनी तक्रार नोंदविल्याने पोलिसांनी आरोपी प्रशांत उराडे याच्या विरुद्ध बीएनएसच्या कलम 64, 64 (2)(i), 64(2)(M), 351 (2)(3) तथा पोक्सो व ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

घटनेचा पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात विजय वानखेडे, अमोल मुन्नेलवार, प्रदीप ठाकरे हे करीत आहे.
Previous Post Next Post