टॉप बातम्या

निराधार, शेतकरी व असंघटीत वर्गाचे विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

हिंगणघाट : महाराष्ट्र प्रदेश ज्येष्ठ नागरीक व निराधार अत्याचार मुक्ती संघर्ष समितीच्या प्रदेश अध्यक्षा श्रीमती मंगला ठक यांच्या नेतृत्वात आजपासून निराधार, शेतकरी व असंघटीत वर्गाच्या विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन येथील तहसील कार्यालयासमोर सुरु केले असून आज आंदोलनाचा पहिला दिवस उजळला आहे. 

आंदोलन कर्त्यांच्या मागण्या खालील प्रमाणे :
१) ५५ वर्षावरील वयोवृध्द निराधार व शेतकऱ्यांना ५००० रु. महिना मानधन मिळावा. २) निराधारांची उत्पन्न मर्यादा २१००० वाढून ५० हजार करण्यात यावी व निराधार, शेतकऱ्यांना नियमित अनुदान देण्यात यावे. ३) घर तेथे शौचालय, त्या प्रमाणे प्रत्येक राशनकार्ड धारक महिलांना प्रत्येक घरी एक शिलाई मशीन मिळावी जेणेकरुन त्यांना घरघुती उद्योग करता येईल. ४) शेतकऱ्यांचा मालाचा हमी भावाचा कायदा करणे. ५) शहरी व ग्रामीण भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना कायम स्वरुपी पट्टे देणे.
६) जबरणजोत शेतकऱ्याला व जमीन धारकाला कायम स्वरुपी जमिनीचे पट्टे देणे. ७) सरकारने घरकुल मध्ये 'ड' क्रमांक यादी थांबवून गरजूंना घरकुल योजनेत समाविष्ट करणे व तशी यादी तयार करण्यात यावी. 

सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मंगला ठक यांचे नेतृत्वात निराधार, शेतकरी व असंघटित वर्गाच्या न्यायाकरिता बेमुदत धरणे आंदोलन तहसील कार्यालयांसमोर मंगळवार (दि.१०) सप्टेंबर पासून आंदोलन करण्यात येत आहे. या धरणे आंदोलनास अनेकांचे समर्थन मिळत असून जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे श्रीमती मंगला ठक यांनी सांगितले. 

यावेळी शेतकरी किसान समितीचे निशिकांत शिंगरू, चिंतामण दारुंनकर, दिवाकर आसोले, गजानन भोमाले, शेषराव बोयर, गीता भगत, मालू लोणकर, कुसुम नगराळे, सुमन भगत, यासह अनेक माता भगिनींनी या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहे.
Previous Post Next Post