सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : वणी येथे दि.२९ सप्टेंबर २०२४ रोजी आदिवासी सामाजिक न्याय संसद होत असुन, या संसदेचे निमंञण घेवुन वणी येथील मान्यवर ऊत्तम गेडाम, गित घोष, रामदास गेडाम, भाऊराव आञाम, श्रीकृष्ण मडावी, महेश आञाम यांनी आदिवासी साहित्यीक बाबारावजी मडावी यांची भेट घेतली. आदिवासी न्याय संसदेबाबत गित घोष आणि ऊत्तम गेडाम यांनी सविस्तर चर्चा करुन भुमिका सांगितली. या संसदेस विविध पक्षाचे मंञी, खासदार, आमदार यांना निमंञीत करण्यात आले आहे. संसदेत आदिवासीच्या संविधानात्मक हक्कावर होत असलेल्या अन्यायाचे संबधाने भुमिका घेणार आहात की नाही? अशी रोखठोक भुमिका घेण्यात येणार आहे. आदिवासीचा विकास राजकिय प्रतिनिधिंच्या अनास्थेमुळे अडगळुन पडला असुन आदिवासींनी केवळ मतदान देण्याची भुमिका घ्यायची व अन्याय सहन करीत रहायचे काय. या भुमिकेवर या संसदेने आदिवासीत जागरण करुन राजकिय विद्रोही भुमिका घेण्याचे ठरविले. ही भुमिका आदिवासीच्या राजकिय विद्रोहाची ठीणगी होय. ती पेटणे आवश्यकच होते. राजकारण अन्याय शोषण झुगारणारे असल्या शिवाय विकास होणार नाही. विशेषतः आदिवासी राजकिय प्रतिनिंधींनी राजकिय सशक्त भुमिका स्विकारुन समाज विकासासाठी सावध होणे गरजेचे आहे. आदिवासीचे आरक्षण पळवल्या जाते? बोगस आदिवासी लुटताहेत म्हणजे आदिवासींच्या संविधानात्मक स्वातंञ्यावरच घाला होय. ही जबाबदारी समजुन घेऊन वणी येथील समाजनेत्यांनी आदिवासी न्याय संसद आयोजीत करुन सुरवात केली आहे. या निमंत्रण अनुषंगाने सर्व मान्यवरांचे साहत्यीक बाबारावजी मडावी व सुनंदा मडावी माजी नगरसेविका यांनी स्वागत केले.
वणी येथील मान्यवरांनी घेतली साहित्यीक बाबाराव मडावी यांची स्नेह भेट
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 26, 2024
Rating: