टॉप बातम्या

कळंब येथे महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे आयोजन

सह्याद्री चौफेर | रुस्तम शेख 

कळंब : महिलांचे अधिकार, मुली व महिला वर होणारे अन्याय , अत्याचार या महत्त्व पूर्ण विषयावर चर्चा करण्याच्या उद्देशाने पोलीस मित्र परिवार समन्वय समिती महाराष्ट्र राज्य कळंब विभागाच्या वतीने दिनांक २८ सप्टेंबर २०२४ रोज शनिवारला सकाळी ११ वाजता राम मंदिर कळंब येथे पोलीस मित्र परिवार समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष डॉ संघपाल उमरे यांच्या अध्यक्षतेखाली "महिला सक्षमीकरण कार्यशाळेचे" व समितीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ओळखपत्र वाटपाचे आयोजन केले आहे.
 
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून कळंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री राजेश राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुभाष मानकर गटविकास अधिकारी पंचायत समिती कळंब, श्री. धिरज स्थुल तहसीलदार कळंब, श्री. अमोल वरसे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कळंब, डॉ. विजय अकोलकर तालुका आरोग्य अधिकारी कळंब, वंदना नानवटे प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कळंब, जया अराठे यवतमाळ महिला अध्यक्षा पो. मि. प. स. समिती, श्री मनीष गुडघे अमरावती विभाग प्रमुख , श्री पवन धोत्रे ग्रामीण पत्रकार सघं उपाध्यक्ष ,निखिल वाहाने चांदुर (रेल्वे) विभागीय प्रमुख इत्यादी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. 

तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती पोलीस मित्र समन्वय समिती कळंबच्या वतीने करण्यात आली आहे.
Previous Post Next Post