सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
महागांव : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तत्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागाव तालुक्याच्या वतीने जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
या वेळी उपजिल्हा प्रमुख प्रमोद भरवाडे, विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव, तालुका प्रमुख रवींद्र भारती, युवती जिल्हा संघटिका मंजुषा वानखेडे, तालुका संघटिका उज्वला ठाकरे, जया हेमंत खरे, तेजस नरवाडे, राहुल राठोड, सुशील गावंडे, विलास फाळके, आकाश राठोड, सोनू खान, विनोद चव्हाण, राजू दोडके, प्रवीण भांगे, शंकर टेटस, रमेश चव्हाण, उमेश गाडे आदींची उपस्थिती होती.
बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना (ऊबाठा) च्या वतीने निषेध आंदोलन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 21, 2024
Rating: