नारीशक्तीचा एल्गार, अवैध दारू विक्री होत असलेल्या धाब्यावर 'हल्लाबोल'

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : तालुक्यातील मंदर येथील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारत धाब्याला आगीत ढकलले. तसेच धाबा चालक व धाब्यातील एका सहका-याला बेदम चोप दिला. मंगळवारी (ता. 20) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वणी-घुग्घुस रोडवरील निलगिरी बन जवळ हा खळबळजनक प्रकार घडला आहे. 

वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केल्याची माहिती आहे. घटनास्थळी येजा करणाऱ्याची तोबा गर्दी उसळली होती.

वणी-घुग्घुस महामार्गांवर निलगिरी बन च्या समोर 'बाबूभैया का धाबा' नामक धाबा आहे. या धाब्यातून दारूची अवैधरित्या विक्री सुरु होती, असा महिलांचा आरोप आहे. गावातील अनेक तरुण मुलं व्यसनाच्या आहारी गेले. त्यामुळे गावाचे घरचे वातावरण कलूषित होऊन अनेक समस्याचा सामना करावा लागत असल्याने याबाबत महिलांनी अनेकदा धाबा संचालकाला समज दिली. मात्र, धाबा चालकाने याकडे दुर्लक्ष केले. 

तीन दिवसांपूर्वी मंदर येथील महिलांनी याबाबत तक्रार दिली. त्यानंतर महिलांनी वाट पाहिली. मात्र, यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अखेर मंगळवारी येथील संतप्त नारीशक्ती एकवटल्या व सुमारे 35 ते 40 महिलांनी धाब्यावर हल्लाबोल केला. 
नारीशक्तीचा एल्गार, अवैध दारू विक्री होत असलेल्या धाब्यावर 'हल्लाबोल' नारीशक्तीचा एल्गार, अवैध दारू विक्री होत असलेल्या धाब्यावर 'हल्लाबोल' Reviewed by सह्याद्री चौफेर on August 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.