दोन ट्रॅक्टर वर महसूल पथकाचा छापा; तहसीलदार निलावाड यांची कारवाई


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : हिवरा (म) ते मार्डी रोडवरुन अवैध वाळू उत्खनन करून वाहतूक करीत असताना दोन ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय मारेगांव येथे लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या कारवाईने रेती तस्कराध्ये चांगलीच धास्ती वाढली आहे. 

सदरची कार्यवाही पथक प्रमुख श्री. उत्तम निलावाड तहसीलदार मारेगांव, सहाय्यक तलाठी विवेश सोयाम, सनी कुळमेथे, विकास मडावी यांनी रात्री 3.00 वाजेपासून पाळत ठेऊन होते, सकाळी 6.10 वाजता च्या दरम्यान कारवाई करण्यात आली आहे.

या धडक कारवाई ने तालुक्यातील अवैध रेतीची चोरी पुन्हा उघडकीस आली आहे.
दोन ट्रॅक्टर वर महसूल पथकाचा छापा; तहसीलदार निलावाड यांची कारवाई दोन ट्रॅक्टर वर महसूल पथकाचा छापा; तहसीलदार निलावाड यांची कारवाई Reviewed by सह्याद्री चौफेर on August 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.