वंचित बहुजन आघाडीत आदिवासी बांधवांचा पक्ष प्रवेश

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा क्षेत्रात नवनिर्वाचित वणी तालुका अध्यक्ष हरीष पाते ह्या उमद्या नेतृत्वाची संजीवनी वंचित बहुजन आघाडीला मिळताच तालुक्यातील ग्रामीण भागात शाखा, व पक्षप्रवेशा चा धडाका सुरू झाला आहे. 

महाराष्ट्रात वंचित बहुजनांची एक मोठी वोट बँक उभारण्यात वंचित बहुजन आघाडी ला मोठं यश आले आहे. त्यामुळे नागरिकांचा वंचित बहुजन आघाडीकडे कल वाढत असल्याचे चित्र दिसत असून वंचित मध्ये नव्या सदस्यांच्या पक्षप्रवेशाचा उत्साह सध्या वाढत आहे. हरीष पाते यांचा वणी विधानसभा क्षेत्रात तळागाळातील सामान्य माणसात, जनतेत असलेला दांडगा जनसंपर्क, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची नागरिकांसोबत चांगली मैत्रीपूर्ण ओळख आहेच, तालुका अध्यक्षांची किंबहुना बहुजनांची धुरा त्यांच्या खांद्यावर देताच मागील काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने तालुक्यात झंझावात दौरा सुरु झाला असून, वणी तालुका, शहर, ग्रामीण मधील असंख्य कार्यकर्ते, महिला, युवकांचा पक्ष प्रवेश करित आहे. त्यातच काल विरकुंड व दहेगाव येथील असंख्य महिलांनी तसेच युवकांनी हरीष पाते यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केला. 

यावेळी संघटक किशोर गिरडकर, प्रदीप मडावी, बुद्ध घोष लोणारे, गजानन दामोदर, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. वणी विधानसभेचा कल हा वंचितकडे असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

वंचित बहुजन आघाडी ला मोठे बळ मिळाले- हरीश पाते 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्व २८८ मतदारसंघासाठी 'गॅस सिलिंडर' हे सामाईक निवडणूक चिन्ह दिल्यामुळे वंचित बहुजन आघाडी ला मोठे बळ मिळाले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राज्य सह गाव पातळीवर मतदारांच्या घराघरात गॅस सिलिंडर हे निवडणूक चिन्ह पोहोचवणे सोयीचे जाणार असल्यामुळे त्याचा परिणाम मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता होणार आहे. 
-हरीश पाते 
वणी तालुका अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी 
वंचित बहुजन आघाडीत आदिवासी बांधवांचा पक्ष प्रवेश वंचित बहुजन आघाडीत आदिवासी बांधवांचा पक्ष प्रवेश Reviewed by सह्याद्री चौफेर on August 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.