चाकूचा धाक दाखवून मोबाईल दुकानदाराला लुटले; दरोडेखोर विरोधात पोलिसात तक्रार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : चाकूचा धाक दाखवून एका नामांकित मोबाईल व्यावसायिकाला लुटल्याचा खळबळजनक प्रकार शहरातील वसंत गंगा विहार परिसरात रात्री 9.20 च्या दरम्यान घडला आहे. शहरात ठिकठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असूनही दरोडा घडल्याने व्यावसायिकात दहशत निर्माण झाली आहे.

वसंत गंगा विहार येथील अंकुश मोबाईल शॉप चे संचालक अंकुश बोढे हे काल सोमवारी रात्री 9.20 च्या दरम्यान शहरातील ठाकूरवार कॉम्पलेक्स मधील मोबाईल शॉप बंद करून रात्री नेहमीप्रमाणे वसंत गंगा विहारला बाईकने घरी जात होते.

त्यावेळी कालोनीच्या प्रवेश द्वाराजवळ कारमधून आलेल्या चौघानी अंकुश बोढे यास अडवून चाकूचा धाक दाखवत हातातील सहा लाख रुपये असलेली बैग हिसकली. शॉप संचालकाने प्रतिरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्याला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याचीही चैन सुद्धा बळजबरीने ओढून घेतली. संचालक बोढे यांनी वणी पोलीस ठाण्यात लूटपात करणाऱ्या दरोडेखोर विरोधात 6 लाख 50 हजार रूपयांच्या मुद्देमालाची तक्रार दाखल केली आहे. वणी पोलीस अधिक तपास करत आहे.
चाकूचा धाक दाखवून मोबाईल दुकानदाराला लुटले; दरोडेखोर विरोधात पोलिसात तक्रार चाकूचा धाक दाखवून मोबाईल दुकानदाराला लुटले; दरोडेखोर विरोधात पोलिसात तक्रार Reviewed by सह्याद्री चौफेर on August 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.