टॉप बातम्या

सज्जा आपटी येथे ई-पिक बाबत शेतकऱ्यांना देण्यात आली माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सन 2024 मधील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी शेतात पिकांची पेरणी केलेली आहे. त्या पिकांची ई-पीक पाहणीचा सध्या कार्यक्रम चालू आहे.आज दि. 24/8/2024 शनिवार रोजी मारेगाव तालुक्यातील त्या त्या गावातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल, ग्राम पंचायत, मंदिरात, चौकात आणि गावातील जास्तीत जास्त शेतकरी एकत्रित येतात अशा ठिकाणी सभा घेऊन ई-पिक पाहणीचे महत्व सांगितले जात आहेत. आज सज्जा आपटी येथे ई-पिक बाबत माहिती देण्यात आली. 

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर जाऊन ई- पिक पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचारी शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. सध्या शासन स्तरावर ई-पिक पाहणी अतिशय महत्त्वाची बाब झाली आहे. एका मोबाईल वरून 100 शेतकऱ्यांचे/खातेदारचे ई-पिक पाहणी करता येते. सर्व शेतकऱ्यांनी 100 टक्के ई-पिक पाहणी करून भविष्यात मिळणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. असे आव्हान तहसीलदार उत्तम निलावाड, मारेगांव यांनी केलेले आहे. 

मारेगांव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी अडचणी येत आहेत, अशा शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, कोतवाल, कृषी पर्यवेक्षक आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असेही तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात येत आहे.तसेच वर्धा नदीला पाणी सोडल्याने नदी काठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

Previous Post Next Post