नांदेड : सध्या महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त चर्चेत असेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना ही योजना सरसकट मतदार यादीनुसार लाभ देण्यात यावा,अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य च्या महिला उपाध्यक्ष सीमा स्वामी लोहराळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना तळागळातील महिला पर्यंत पोहोचण्यासाठी आणि यशस्वी करण्यासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहे. मात्र, कुटुंब सांभाळत पोटासाठी बाहेर काम करणाऱ्या काही महिलांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. या योजनेपासून कोणतीही महिलां वंचित राहू नये, तसेच बहिणीला शहराच्या ठिकाणी होणारा दैनंदिन आर्थिक भुरदंड,काम बुडवून योजनेच्या मागे फिरणे, व सतत योजनेतील बदलामुळे आपल्या लाडक्या बहिणीला नाहक त्रास होणार नाही आणि जाचक अटीपासून सुटका मिळेल अशी अपेक्षा आहे.
त्यामुळे सरसकट हाच एकमेव उपाय दिसत असून मतदार यादीनुसार लाभ देण्यात यावे अशी, मागणी सौ.लोहराळकरांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना केली. निवेदनाचा तात्काळ विचार करून माझ्या लाडक्या बहिणींसाठी निर्णय घ्यावा,अशी विनंती सह मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्ष सीमा स्वामी लोहराळकर यांनी केली आहे.