संगीत विशारद रविकिरण घुमे सन्मानित

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : सावित्रीबाई फुले गुण गौरव समिती, मारेगावच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परिक्षेत वैशिष्ट्य पुर्ण गुण घेऊन उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये संगीत विशारद रविकिरण घुमे यांना मा. श्री. उत्तम निलावाड (तहसीलदार) यांचे हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येथील शेतकरी सुविधा केंद्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट होते,उद्घाटन वर्धमान फाउंडेशन वणीचे अध्यक्ष विजय चोरडीया यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणुन मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भिमराव व्हनखडे, नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, क्रुषी अधिकारी संदिप वाघमारे, तालुका सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगावचे व्यवस्थापक आरीफ शेख, दुग्ध विकास विभागाचे सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक श्रीराम कुमरे,स्वागताध्यक्ष सरपंच संघटनेचे तालुका सचिव सुरेश लांडे, सरपंच तुळशिराम कुमरे, नगरपंचायत बांधकाम सभापती अंजुम शेख, मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सन 2023-24 या सत्रात 10 वीच्या परिक्षेत 80 टक्के व 12 वी च्या परीक्षेत 65 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच या सन्मान सोहळ्यात, सन 2023-24 वर्ष भरात उत्तम सेवा करणाऱ्या लोकसेवक,व पदाधिकारी यांचा सुध्दा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या मध्ये समाजसेवक म्हणुन कोसारा येथील व्रुध्दाश्रमाचे अध्यक्ष जीतेंद्र जाधव, पत्रकार कुमारअमोल कुमरे, तलाठी जयवंत कनाके, पोलीस पाटिल प्रेमानंद गाणार,ग्रामसेवक विलास शिवरकर, अंगणवाडी सेविका दमयंती फुलझेले, क्रुषी उद्योजक राजु तुराणकर,संगित विशारद रविकिरण घुमे, डॉ.कवि:विनोद कुमार आदे, यांचा समावेश आहे. 

सुत्रसंचालन स्नेहलता चुंबळे,यांनी प्रास्ताविक तुळशिराम कुमरे,तर आभार प्रशांत भंडारी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदेश तातेड,अविनाश कनाके,विजया दारूंडे,आनंद गव्हाणे ईत्यादी नी प्रयत्न केले. कार्यक्रमात पालक, विद्यार्थी तथा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रकमाचे आयोजक प्रतिभा तातेड, पत्रकार माणिक कांबळे यांनी केले होते. 
Previous Post Next Post