सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : स्व. पारसमलजी चोरडिया फाऊंडेशन, वणीतर्फे पाटण येथील बालाजी सभागृहात (ता. 1) ऑगस्ट रोजी मोफत नेत्रचिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटपवर आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. शिबिरात जवळपास 850 रुग्णांनी सहभाग घेतला. शंभरावर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरून 50 च्या वर रुग्णांना कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम येथे पाठविण्यात आलं.
स्व. पारसमल चोरडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांनी वणी, मारेगाव व झरी तालुक्यात विविध ठिकाणी नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व निःशुल्क चष्मे वाटप करण्यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. अनेक वर्षांपासून विजय चोरडिया यांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करून रुग्णांच्या आवश्यकतेनुसार सेवाग्राम येथे स्वतः खर्चाने पाठवून डोळ्यांची शस्त्रक्रिया करून देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
त्यांच्या उपक्रमाला समाजातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिरासाठी चोरडिया हॉस्पिटल, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विजय चोरडिया मित्र परिवार तथा वणी विधानसभा क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाटण येथे नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया शिबिराला प्रतिसाद
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
August 03, 2024
Rating: