सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मुंबई : भारतीय संस्कृतीला काळिंबा फासणारे विहार लेक पवई येथील वासनेचा खुलेआम बाजार मांडणारे सर्व हॉटेल्स तात्काळ बंद करावेत अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.
या परिसरात के. अशोक राय यांच्या टुरिस्ट हॉटेल सह एक्स प्रेस हॉटेल आणि स्टुडिओ, हॉटेल ग्रीन वूड, हॉटेल ग्रीन व्हील, हॉटेल कॅफे विहार तसेच हॉटेल हील विव नावांची हॉटेल्स असून केवळ आणि केवळ "चमडी पे दमडी" या उक्तीप्रमाणे वासनेचा बाजार मांडला गेला आहे. प्रेमियुगल आपली शारीरिक भूक भागविण्यास तोंडाला रुमान बांधून या ठिकाणी येतात. आणि दुस्कृत्य करतात, हे भविष्यात जोडप्यांना अवघड होऊन बिकट परिस्तिथीला तोंड द्यावं लागत.
या सर्व हॉटेलच्या बाजूला मुंबईला पाणी पुरवठा करणारे विहार लेक तलाव आहे. या तलावात या हॉटेलात येणाऱ्या एखाद्या पर्यटकाने काही टाकले तर पूर्ण मुंबई मृत्युंच्या दारावर पोहोचू शकते. त्यामुळे अश्या ठिकाणी हॉटेल्स ना ठेवणे कधी श्रेयस्कर ठरेल असेही डॉ. माकणीकर म्हणाले.
पुढे बोलताना डॉ. माकणीकर म्हणाले की, विस्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार या हॉटेल्स मध्ये अल्पवईन प्रेमियुगलांना सरळ प्रवेश मिळतो. हॉटेल्सच्या वतीनेही इच्छुकांन्ना व पैसे मोजणाऱ्यांना वेगळी व्यवस्था करवून त्यांना सहवासासाठी मुली पूर्वील्या जातात. या गोष्टींची खबर पोलिसांना असूनसुद्धा ते न्यायालयाने शारीरिक संबंधाला परवानगी दिली, असं सांगून हॉटेलच्या वासनेच्या बाजाराला सकारात्मक आणि कायदेशीर रूप देतात.
आंबेडकरी ऍक्टिव्हिस्ट व समजभूषण डॉ. राजन माकणीकर यांनी या सर्व हॉटेल चे ऑडिट तपासावे, अग्निशमन दल व पालिकेच्या परवानग्या तपासाव्यात, येणारे जाणारे कॉल लॉग, सी.सी.टीव्ही कॅमेऱ्यांचे सर्व फुटेज तपासावे, जमा केलेली कागदपत्र व नोंदी घेतलेले रजिस्टर तपासावे. अशी मागणी करुन सरसकट वासनेचा बाजार बंद करण्याची मागणी केली आहे. अन्यथा दि.5 नोव्हेंबर रोजी राजभवन समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा डॉ.माकणीकर दिला आहे.
विहार लेक पवई येथील वासनेचा बाजार मांडलेली सर्व हॉटेल्स बंद करा- डॉ. राजन माकणीकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2023
Rating: