हिवरा (मजरा) येथे भव्य रक्तदान शिबीर

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील विघ्नहर्ता गणेश मंडळ हिवरा (मजरा) तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक ७ ऑक्टोंबर २०२३ रोज शनिवार सकाळी १० ते ४.०० पर्यंत करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटक मनसेचे पक्ष नेते राजू उंबरकर हे असणार आहे. जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन येथील गणेश मंडळाचे सदस्य हे समाजकार्य करत आहे, रक्तसंकलन करण्यासाठी नागपूर येथील स्वाई ब्लड बँक व त्यांचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत शिबीर पार पडणार आहे. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विघ्नहर्ता गणेश मंडळाचे अध्यक्ष गणेश इनामे, उपाध्यक्ष आषिष डोये, सचिव वैभव शेंबळकर, अक्षय नांदेकर, सुमित बुटे, गणेश खीरटकर, महेश रासेकार, आकाश डोये,, रितिक दुर्गे, सचिन काळे, दिपक गाडगे, निखिल धानोरकर, कपील काळे, यासह सर्व सदस्यांनी केले आहे.