सह्याद्री चौफेर | विवेक तोडासे
मारेगाव : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर वणी येथे आयोजित पदवीधर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष मा नानाभाऊ पटोले यांचा दौरा असतांना त्यांचं प्रथम आगमनानिमित्त मार्डी येथील ग्रामपंचायत सरपंच रविराज चंदनखेडे यांनी स्वागत सत्कार समारंभ आयोजित केला होता.
आज रविवारला दुपारी नानाभाऊ पटोले हे आपल्या ताफ्यासह मार्डीत दाखल होताच ग्रामपंचायत च्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायतला भेट दिली. यावेळी उपस्थितांनी मा नानाभाऊ पटोले यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मार्डी ग्रामपंचायत च्या वतीने मार्डी ते नांदेपेरा निकृष्ट दर्जाच्या या राज्य मार्गाची चौकशी करावी असे निवेदन देण्यात आले. केवळ एक वर्षाच्या अवधीत या राज्य मार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मार्डी ते नांदेपेरा या राज्य मार्गाची गुणवत्ता तपासून आवश्यक उपाय योजना व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. सन्माननीय प्रदेशाध्यक्षांनी निश्चितच याची चौकशी करण्यास सरकार ला भाग पाडू असे त्यांनी आश्वासन दिले आहे. या सदिच्छा भेटी दरम्यान, कुंभा, मार्डी सर्कल मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मा नानाभाऊ यांच्याशी विविध प्रश्ना संदर्भात चर्चा ही केली.
काँग्रेस चे माजी आमदार वामनराव कासावार, माजी जि प सदस्य व माजी महिला बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर यांच्या नेतृत्वात ते पुढील कार्यक्रमाला वणीकडे रवाना झाले. यावेळी माजी मंत्री वसंतरावजी पुरके, जिल्हा अध्यक्ष प्रफुल मानकर, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, वजाहत मिर्जा विधानसभा परिषद आमदार, मनिष पाटील माजी अध्यक्ष मध्यवर्ती बँक, आदींचा समावेश होता.
यावेळी सत्कार समारंभ प्रसंगी काँग्रेस चे जेष्ठ नेते नानाजी खंडाळकर, मारेगाव तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, वसंतराव आसुटकर, विजय बोथले, नंदेश्वर आसुटकर, अंकुश माफूर, सरपंच रविराज चंदनखेडे, सदस्य सुरेश चांगले, विजय धानोरकर, समीर सय्यद, गंगाधर ठावरी, अतुल बोबडे, किशोर पिंगे, धनंजय आसुटकर, यांच्या सह काँग्रेस चे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.