टॉप बातम्या

तुम्ही बनवलंय का आयुष्मान कार्ड? मिळतात 5 लाखांपर्यंत फायदे..


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

यवतमाळ : आरोग्य मंत्रालयाने आता सर्वसामान्य नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड जारी केले आहेत. यामुळे त्या कार्डधारकाला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळते.

मात्र, अनेकांना याबद्दल माहिती नाहीये. जर तुम्ही अजूनही आयुष्मान कार्ड बनवले नसेल तर वेळ गेलेली नाहीय. परंतु, सर्वात अगोदर तुम्ही या योजनेस पात्र आहात की नाही याची खात्री करून घ्यावी लागेल.
अशी तपासा पात्रता

सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आयुष्मान भारत योजनेचे नाव बदलून 'आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना-मुख्यमंत्री योजना' असे केले आहे. या योजनेंतर्गत कार्डधारकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पॅनेलमधील रुग्णालयांमध्ये मोफत मिळतात.

-स्टेप 1
● आयुष्मान कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्ही प्रथम तुमची पात्र आहात की नाही ते चेक पाहिजे.
● पात्रता तपासण्यासाठी तुम्हाला आयुष्मान योजनेच्या अधिकृत पोर्टल http://pmjay.gov.in वर जावे लागेल.

-स्टेप 2
● पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या 'Am I Eligible' या पर्यायावर जावे लागेल
● त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो येथे टाका
● आता तुमच्यासमोर दोन पर्याय येतील, एक म्हणजे तुम्हाला तुमचे निवासी असलेले राज्य निवडायचे आहे.

-स्टेप 3
● दुसरा पर्याय म्हणजे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि रेशनकार्ड क्रमांक टाकावा लागेल.
या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पात्रतेबद्दल समजेल.
असे बनवा आयुष्मान कार्ड

● सर्वप्रथम तुमच्या जवळ असलेल्या सार्वजनिक सेवा केंद्रात जा. 
● तिथे संबंधित अधिकाऱ्याला आधारकार्ड, रहिवासी दाखला, शिधापत्रिका आणि मोबाईल क्रमांक ही माहिती द्या. 
● यानंतर संबंधित अधिकारी तुमचा अर्ज आणि कागदपत्रे तपासेल आणि तुमची पडताळणी झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांत तुमचे आयुष्मान कार्ड तयार होईल.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();