मच्छिन्द्रा येथील संतापलेल्या महिलांनी पकडली अवैध दारू


• एकाला घेतले ताब्यात तर दोन फरार

सह्याद्री चौफेर | न्यूज 
9011152179

मारेगाव : तालुक्यातील मच्छिन्द्रा येथे गेल्या काही दिवसापासून अवैध दारू विक्री जात आहे. अगदी शाळे च्या लगत तळीरामांची रेलचेल असते त्यामुळे विद्यार्थ्यावर परिणाम होईल, आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. गावात भांडण तंटे होतील, गावाचे वातावरण बिघडत असल्याने याबाबत मारेगाव ठाण्यात असंख्य महिलांच्या उपस्थितीत दि. 24 नोव्हेंबर 2022 ला तक्रार दिली होती, कायम दारू विक्री बंद करा अशी मागणी येथील महिलांनी लावून धरली असतांना विक्रेत्याला बिट जमादार रजनीकांत पाटील यांनी त्याला गावातून उचलले आणि कारवाई करून सोडले असे तक्रारकर्त्या महिलांनी सांगितले. मात्र, तरी देखील अवैध दारू गावात खुलेआम विकली जातच होती. गावातच पव्वा मिळत असल्यामुळे पिण्याऱ्यांची संख्या वाढली, साहजिकच मागणी वाढल्याने पुरवठा वाढला, यावर पोलिसांची थातूर मातुर कार्यवाही होत असल्याचे पाहून महिलामध्ये गरम वातावरण निर्माण झाले, "आमचं ठरलं" म्हणत असंख्य महिला आक्रमक झाल्या, दारू पकडायचीच आणि अखेर पोलिसांच्या नाकावर टिचून आज रविवारी सायंकाळी गावालगत असलेल्या शेताच्या धुऱ्यावर दारूची पेटी घेवून येणाऱ्या मारोती घाटे व रमेश पेंदोर याला पकडले. महिला व दारू घेवून येणाऱ्यात झटापट झाली महिलांचा जोर कमी पडल्याने रमेश नामक याने घटना स्थळावरून पोबारा केला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. तात्काळ बिट जमादार पाटील व वाभीटकर यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. व आरोपीना ताब्यात घेतले, परंतु दुसऱ्या साथीदाराला व मुख्य विक्रेत्याला पकडा अशी आक्रमक भूमिका घेत नागरिकात गरम वातावरण निर्माण झाल्याने दोघांची शोधाशोध केली, परंतु ते काही हाती लागले नसल्याने अखेर दुचाकी क्र. एम एच 29 ए ई 2117 व मारोती घाटे याला पकडून नेण्यात आले. यावेळी गावातील शेकडो महिला,पुरुष, युवक व बालगोपाल जमली होती.
मच्छिन्द्रा येथील संतापलेल्या महिलांनी पकडली अवैध दारू मच्छिन्द्रा येथील संतापलेल्या महिलांनी पकडली अवैध दारू Reviewed by सह्याद्री चौफेर on November 27, 2022 Rating: 5
Powered by Blogger.