विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या, सुर्ला येथील घटना

सह्याद्री चौफेर | न्यूज 

मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सुर्ला येथील एका विवाहितेने गळाफास घेतला. ही घटना रात्री 8.30 वाजताचे दरम्यान, घडली.

अस्मिता नितीन दूधगवळी (वय 28) असे गळाफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. विवाहितेने रात्री साडीने गळाफास लावण्याचा प्रयत्न केला, ही बाब घरच्यांना लक्षात येताच वणी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे.

अस्मिताच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून तिच्या पश्चात सात वर्षाची मुलगी, पती, सासू सासरे असा आप्त परिवार आहे.

पुढील तपास पोलीस करित आहे.

Post a Comment

Previous Post Next Post