सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत कोलगाव येथील एका तरुण शेतकऱ्याने विषाचा घोट घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारला सकाळी सहा वाजता उघडकीस आली.
प्रमोद रुदाजी धोंगडे (अं.वय 45) रा. कोलगाव असे विष प्राशन करून जीवन संपावलेल्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मृतक प्रमोद हे दोन एकर शेती सह इतरही मजुरीची कामे करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होते.
मारेगाव कडून मांगरूळ कडे जाणाऱ्या हायवे रस्त्यालगत एका शेतात विष ग्रहण करून त्याने जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त होत. सकाळ च्या सुमारास शेतकऱ्यांना शेतात जातांना ही दुर्देवी घटना उघडकीस आली.
त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नसून मृतक प्रमोद यांचे पश्चात आई, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.