चंद्रभागेत मारेगाव तालुक्यातील 150 सेवक झाले स्वच्छता अभियानात सहभागी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : आषाढी एकादशीला पंढरपूरला श्री विठोबा - रुकमाईच्या दर्शनासाठी येतात. चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतात. दरवर्षी या आनंददायी सोहळ्यात चंद्रभागा नदीत प्रचंड अस्वच्छता निर्माण होते. ही अस्वच्छता दूर करण्यासाठी मागील ११ वर्षापासून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज व गीताचार्य तुकारामदादा यांचे विदर्भ मराठवाड्यातील अनेक अनुयायी स्वेच्छेने तथा स्वखर्चाने पंढरपूरात येवून स्वच्छता अभियान राबवितात.

मारेगाव तालुक्यातील कानडा येथून स्वच्छता दिंडी पालखी घेऊन पंढरपूर येथे जाऊन स्वच्छ्ता दूत कानडा येथील सरपंच सौ सूषमा रूपेश ढोके सह हिवरा, वनोजा गावातील व तालुक्यातील एकूण १५० सेवक सहभागी झाले आहेत.यावेळी आमच्या प्रतिनिधीने येतील काही सेवकांना संपर्क साधून संवाद साधला असता अभियानात सहभागी झालेले तालुका अध्यक्ष तथा गुरुदेव प्रेमी रुपेश ढोके यांनी अभियान बाबत माहिती देत स्वच्छता ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येकाने आपलं गांव,आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून आणि हे अकराव वर्ष आहे सतत चंद्रभागेत येऊन ही सेवा देत आहोत,असेही ते म्हणाले.

यावर्षी पंढरपूरातील सांगोला मार्गावरील 'ग्रामगीता तत्वज्ञान सक्रीय दर्शन मंदिराचे' संचालक श्री सेवकराम मिलमिले यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी ८ जूलैला श्री पुंडलीक मंदिराजवळ चंद्रभागेची स्वच्छता करून अभियानाला सुरूवात झाली व हे अभियान दि.१० जुलै २०२५ पर्यंत सूरू राहील. यावर्षी या अभियानात महिलांचा सहभाग उल्लेखनीय.

भूवैंकुंठ असनाऱ्या पंढरपूरात व परम पवित्र चंद्रभागेत आपल्या कडून कोणत्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही, हे प्रत्येक वारकऱ्याने ठरविल्यास अस्वच्छतेचा राक्षस निर्माणच होणार नाही. पण प्रत्येक वारकऱ्याने याबाबत जागृत व्हावे, हा संदेश पोचविणे, या अभियानाचा आणखी एक उद्देश.

या अभियानासाठी रूपेश ढोके, कवडूजी वडस्कर, स्वच्छता दूत कमळा कावळे मामा, जनार्दन देठे, सूरज येवले, सौ. सूषमा रुपेश ढोके (सरपंच), लखन गीते, भूषण ढोबळे,  दिवाकर गाडगे, राज घूमणार, दिलीप भोयर व प्रा सुरेंद्र नावडे हे परीश्रम घेत आहेत..



Post a Comment

Previous Post Next Post