कोसारा परिसरात जोरदार पाऊस

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : सतत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहेत. 
तालुक्यात अधिकांश कपाशी च्या पेरण्या आटोपल्या असल्या आणि शेतकरी आनंदात असले तरी, सततच्या पावसाने कोसारा परिसरातील शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जर पाऊस असाच सतत सुरु राहिला तर पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, तालुका महसूल प्रशासनाने आतापासूनच सदर परिसराच्या पाहण्या सुरु कराव्या असं येथील शिवसेना (उबाठा) संपर्क प्रमुख तथा उपसरपंच सचिन पचारे यांनी "सह्याद्री चौफेर"शी बोलताना सांगितले. पाणी शेतात भरल्याने पिकाला नुकसान होण्याची शक्यता आहे. बांधावरील तूर व भाजीपाला पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. हे शेतकऱ्यांवर आलेले फार मोठं संकट असल्याचे नाकारता येत नाही, असेही पचारे म्हणाले. 

Post a Comment

Previous Post Next Post