सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : आज केंद्रीय कामगार,कर्मचारी,श्रमीक संघटना व संयुक्त किसान मोर्चाचे वतीने देशव्यापी संप पुकारला.या संपाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जाहीर पाठींबा दिला.त्याअंतर्गत वणी येथील भाकपने राज्य कौंसिल सदस्य काॅ.अनिल हेपट,जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे व तालुकासचिव काॅ.मोरेश्वर कुटलवार यांचे नेत्रुत्वात भरपावसात प्रचंड मोर्चा काढुन आपल्या मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वणी यांना दिले. मोर्चात शेकडोंच्या संख्येत आशा, अंगणवाडी, शालेय पोषण कर्मचारी, आयटकचे कामगार, शेतकरी, शेतमजूर,व भाकपचे कार्यकर्ते सहभागी होते.
👆ही वरील जाहिरात तुमच्या कामाची असू शकते..